विनम्र अभिवादन

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज* *वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे समाजसुधारक* *जन्मदिन - जून २६, इ.स. १८७४* चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहु महाराजांनी समाजात आधुनिक तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच समाजातील अनेक अवैज्ञानिक प्रथांना आळा घातला. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रय...