विनम्र अभिवादन

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे समाजसुधारक*

*जन्मदिन - जून २६, इ.स. १८७४*

चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

शाहु महाराजांनी समाजात आधुनिक तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच समाजातील अनेक अवैज्ञानिक प्रथांना आळा घातला.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

महामंगलसुत्तं 38 मंगल कामना मराठीत अनुवाद

बुद्ध वंदना पाली

मार्गशीर्ष पौर्णिमा महत्व