मार्गशीर्ष पौर्णिमा महत्व


🌕    *मार्गशिर्ष पौर्णिमा*    🌕
      बौद्ध धम्मामध्ये मार्गशिर्ष पौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे. या पौर्णिमेला भगवान बुद्ध राजगृहाला गेले असता तेव्हा श्रेनीय बिंबिसार राजाने यष्टिवन दान दिले. भगवान बुद्ध आल्याचे राजाला समजताच तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी राजा व त्या नगरीतील प्रजा गेली. सर्वांनी भिक्खू संघासह भगवान बुद्धांचे अभिवादन  (त्रिवार पंचांग प्रणाम) केले. त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्रिरत्नाला अंगिकार केला. त्यानंतर राजाने भगवान बुद्धासह भिक्खूसंघाला उद्याचे भोजन दान स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. भगवान बुद्धाने मौन ठेवून त्या भोजन दानाचे निमंत्रण स्वीकारले. भिक्खूसंघासह बुद्धांनी त्यांच्या घरी जाऊन भोजन ग्रहण केले. भोजनदान संपल्यानंतर धम्म उपदेश दिला. राजाने शांत मनाने श्रवण केला. आणि शेवटी भगवान बुद्धांना व भिक्खू संघाला वेळूवन दान दिले. म्हणून याच पौर्णिमेला सिलोनमध्ये (श्रीलंका) या दिवसापासून अर्हता भिक्खुणी संघमित्राच्या हस्ते भिक्षुनी संघाची स्थापना केली. अर्हता भिक्षुनी संघमित्रा ही सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी होती. ती विवाहीत होती. तिला सुमन नावाचा मुलगा होता.
      अशोकाच्या आज्ञेनी ती मोठ्या आनंदाने भिक्षुनी बनली तेव्हा तिचे वय १९ वर्षाचे होते. सिलोनच्या (श्रीलंका) राजाच्या विनंतीवरुन ती सिलोनला गेली आणि तिथे प्रतिष्ठित स्त्रिया भिक्षुनी झाल्या व भिक्षुनी संघ वाढत गेला. नंतर अल्प काळामध्ये भिक्षुनी संघाची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
      याच पौर्णिमेला अर्हता भिक्खुणी संघमित्रा हीने बुद्धगया येथून बोधीवृक्षाची फांदी आणून श्रीलंकामध्ये अनुराधापूर या जुन्या राजधानीच्या शहरात लावण्यात आली. अशा महत्वाच्या घटना या पौर्णिमेला घडल्या आहेत, म्हणून आपण ही पौर्णिमा साजरी करावी.
      समस्तांचं मंगल हो !
                       

Comments

Popular posts from this blog

महामंगलसुत्तं 38 मंगल कामना मराठीत अनुवाद

बुद्ध वंदना पाली