महामंगलसुत्तं 38 मंगल कामना मराठीत अनुवाद
महामंगलसुत्तं
बहु देवा मनुस्सा च मंङ्गलानि अच्चिन्तयुं।
आकंङ्खमाना सोत्थानं ब्रुहि मंङगलमुत्तमं॥१॥
असेवना च बालानं पण्डितानञ्च सेवना।
पुजा च पुजनीयानं एतं मंङ्गलमुत्तमं॥२॥
पतिरुपदेसवासो च पुब्बे च कतपुञ्ञता।
अत्तसम्मापणिधि च एतं मंङ्गलमुत्तमं॥३॥
बाहुसच्चं च सिप्पंञ्च विनयो च सुसिक्खितो।
सुभासिता च या वाचा एतं मंङ्गलमुत्तमं॥४॥
माता-पितु उपट्ठानं पुत्तदारस्स सङ्गहो।
अनाकुला च कम्मन्ता एतं मंङ्गलमुत्तमं॥५॥
दानंञ्च धम्मचरिया ञातकानं च सङ्गहो।
अनवज्जानि कम्मानि एत मंङगलमुत्तमं॥६॥
अरति विरति पापा मज्जपाना च सञ्ञमो ।
अप्पमादो च धम्मेशु, एतं मङलमुत्तमं ।।७।।
गारवो च निवातो च, सन्तुट्ठी च कतञ्ञुता ।
कालेन धम्मसवणं, एतं मङलमुत्तमं ।।८।।
खन्ति च सोवचस्सता, समणानंञ्च दस्सनं ।
कालेन धम्मसाकच्छा, एतं मङलमुत्तमं ।।९।।
तपो च ब्रह्मचरियंच, अरिय सच्चान दस्सनं
निब्बाण सच्चिकिरिया च, एतं मङलमुत्तमं ।।१०।।
फुट्ठस्स लोकधम्मेहि, चित्तं यस्स न कम्पति ।
असोकं विरजं खेमं, एतं मङलमुत्तमं ।।११।।
एतादिसानि कत्वान, सब्बत्थंअपराजिता ।
सब्बत्थ सोत्थि गच्छन्ति, तं तेसं मङलमुत्तमं न्ति ।।१२।।
साधु साधु साधु
महामंगल सुत्त..मराठी अनुवाद
भगवान बुद्ध श्रावस्थी येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना,, एक देवता रात्र संपता, संपता आपल्या तेजाने सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवंताजवळ आली व भगवंताला वंदन करुन एका बाजुला उभी राहिली. आणी एक गाथा म्हटली..
हे भगवान! स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देव आणी मणुष्यांनी मंगलाचा विचार करुनही ते त्यांना गवसले नाही. तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा
भगवान म्हणाले-
मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हेच उत्तम मंगल होय!!
अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय!!
अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, श्ष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हेच उत्तम मंगल होय!!
आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे,हेच उत्तम मंगल होय!!
दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर-
सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणेहेच उत्तम मंगल होय!!
काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हेच उत्तम मंगल होय!!
गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर
धर्मश्रवण करणे, हेच उत्तम मंगल होय!!
क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक
चर्चा करणे,हेच उत्तम मंगल होय!!
तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी
निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल होय!!
ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...
याप्रमाणे कार्य करुन जगात विजयी होऊन लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, हेच त्यांच्याकरीता उत्तम मंगल होय
साधु साधु साधु
http://dhammpracharak.blogspot.com
Comments
Post a Comment