शील पालन करणे आवश्यक

पंचशील

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर मनावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पांच ही शीलाचे पालन करतात.
पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.
साधु साधु साधु

Comments

Popular posts from this blog

महामंगलसुत्तं 38 मंगल कामना मराठीत अनुवाद

बुद्ध वंदना पाली

मार्गशीर्ष पौर्णिमा महत्व