प्रजासत्ताक दिन विशेष
*🔵👉🏻..26 जानेवारी प्रजासत्ताक दिन स्पेशल..✍🏻✍🏻* *सर्वांनी आवश्यक वेळ काढून वाचा.* *प्रजासत्ताक दिन या दिवसी प्रत्येक भारतीय नागरीकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन, अभिवादन केलेच पाहीजे. कारण; प्रजासत्ताक दिन कोणामुळे..? भारतीय संविधानामुळे, तर मग भारतीय संविधान कोणामुळे..? विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे.* *२६ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते.* *२६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला. म्हणजेच संविधानाची अमलबजावणी "२६ जानेवारी" पासून सुरु झाली. त्यालाच"प्रजासत्ताक दिन" असे म्हणतात. मग हा दिन कोणामुळे सुरु झाला? भारतीय संविधानामुळे, भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच निर्माण झाले. मग, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा - कॉलेजानी आणि मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, म्हणजेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे.* *जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून "प्रजासत्ताक दिन" साजरा केला जातो. तेथे-तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या प्रतिमांचे पूजन करूनच "प्रजासत्ताक दिन" साजरा करण्यात यावा. आज पर्यंत असे कोणी केले नसेल. पण आतापासून आपण करुयात. ज्यांनी केले व जे करीत आहेत, त्यांचा कित्ता आपण गीरवुया...* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा. काही ठिकाणी अशी प्रथा सुरु झाली आहे. आता आपण सुरु करुया, शासन सुरु करील याची वाट पाहत बसू नये. "डॉ. बाबासाहेबांबद्दल" शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करुया.* *सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
🙏🏻...जय भीम...🙏🏻* *🙏🏻....जय भारत...🙏* 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
🙏🏻...जय भीम...🙏🏻* *🙏🏻....जय भारत...🙏* 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
Comments
Post a Comment